(Image Source : Internet)
मुंबई :
राज्यातील शेतकऱ्यांचे (Farmers) अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे मोठे नुकसान झाले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांबाबत नुकसान भरपाईबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यादरम्यान तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांचे शेतीमालाचे मोठं नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने हात समोर केला आहे., कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.
- ६४ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मदत करण्याच्या निर्णय
राज्यातील विविध हंगामातील शेतकऱ्यांचं मोठ्या नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा शासनाकडून पंचनामा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळाली नव्हती. पण आता ६४ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मदत करण्याच्या निर्णय राज्य शासनाने घेतला. याकरिता शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार ५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे.
राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना देय असलेले प्रलंबित राज्याच्या हिश्याचे अनुदान म्हणून २ हजार ८५२ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली. नुकसान भरपाईची थेट रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यावर जमा होणार आहे. याबाबत विमा कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळं शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होणार, असल्याचे कोकाटे म्हणाले.