(Image Source : Internet)
अमरावती :
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत, आता ते अध्यक्षही होतील. बाळासाहेब यांनी सांगितले होते की, ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावे लागेल, त्यादिवशी मला दुकान बंद करावे लागेल. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पायदळी तुडवले, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
विकसित भारताला साथ देण्याकरिता संपूर्ण देश पंतप्रधान मोदी यांच्यासोबत उभा आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्रातील १४ कोटींची जनता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभी आहे. महायुतीच्या सोबत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीने आता २०४७ पर्यंत वाट पाहावी. २०४७ पर्यंत त्यांनी आपापल्या पक्षात चांगले काम करावे. मी त्यांना विरोधी पक्षात काम करण्याच्या शुभेच्छा देतो,असा टोलाही बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.