(Image Source : Internet)
नागपूर :
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात काहींनी कर्जमाफीचे आश्वासन दिलं होतं, पण आता राज्याची आर्थिक स्थिती पाहता तत्काळ कर्जमाफी देणे शक्य नाही. ३१ तारखेच्या आत आधीच घेतलेल्या कर्जाची परतफेड करा. निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली गेली होती, ती प्रत्यक्षात येत नाहीत,असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
या आर्थिक वर्षात आणि पुढच्या वर्षात देखील पीककर्ज माफ करण्याची स्थिती सध्या तरी राज्य सरकारची नसल्याचे स्पष्ट करत, परिस्थिती पाहून भविष्यात निर्णय घेऊ असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे कर्जमाफीच्या अपेक्षांवर या वक्तव्याने पूर्णविराम दिला आहे.
बारामती येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली.