उद्धव ठाकरेंना धक्का ;'हा' ज्येष्ठ नेता सोडणार साथ, शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश!

26 Mar 2025 11:39:18
 
Shinde Shiv Sena
 (Image Source : Internet)
मुंबई :
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अहिल्यानगरमध्ये शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले हे लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संदेश कार्ले हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहेत. मुंबईमध्ये ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यापूर्वी देखील अहिल्यानगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकारी आणि नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
 
येत्या काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. अनेक दिग्गज नेते हे ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. जर उद्धव ठाकरेंनी वेळीच योग्य पाऊले उचलली नाहीतर तर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यांची ताकद कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0