कुणाल कामराचा मुंबईतच काय महाराष्ट्रातही शो होवू देणार नाही; राहुल कनाल यांचा इशारा

    26-Mar-2025
Total Views |
 
Rahul Kanal warns Kunal Kamra
 (Image Source : Internet)
मुंबई:
कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर अप्रत्यक्ष टीका करत एका गाण्यातून त्यांना गद्दार म्हणून संबोधित केले. यानंतर शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.
 
कुणाल कामरा याचा शो ज्या हॅबिटॅटमध्ये झाला, त्याची शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते राहुल कनाल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली . याच राहुल कनाल यांनी आता कुणाल कामरा याला इशार दिला आहे. दम असेल तर समोरा समोर येवून चर्चा कर. तू सांगशील ती जागा, तू सांगशील तो दिवस आमची तयारी आहे असे ही त्यांनी सांगितले. शिवाय या पुढे मुंबईच काय महाराष्ट्रात कुणाल कामराचा शो होवू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. कुणाल कामराचे या पुढे मुंबईत शो होवू देणार नाही.
 
महाराष्ट्रात ही त्याचे शो आता होणार नाही. जे कुणी त्याच्या शो चे आयोजन करतील त्यांना आधी आम्ही निट सांगू. तुम्ही त्याचा शो आयोजित करू नका. जर का त्यांनी ऐकले नाही तर शिवसेना स्टाईलने त्यांनाही अशा प्रकारांचा सामना करावा लागेल असा इशाराही कनाल यांनी यावेळी दिला. त्यांनी कुणाल कामाराला ही खुले आव्हान दिले आहे. लपून बोलू नको, तुझ्यात हिंमत असेल तर समोरा-समोर येऊन चर्चा कर,असे आव्हान कामरा याने केले.