मुंबई विमानतळावरील स्वच्छतागृहात मृत नवजात अर्भक सापडल्याने खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

26 Mar 2025 15:38:48
 
dead newborn found
 (Image Source : Internet)
मुंबई :
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर आता मुंबई विमानतळावर (Mumbai airport) स्वच्छतागृहामध्ये नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. लिसांनी या प्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे. बाळाला टॉयलेटमध्ये कोणी सोडलं याचा कसून तपास करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री स्वच्छतागृहात कचऱ्याच्या डब्यामध्ये नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याची बातमी येताच मुंबई विमानतळावर एकच खळबळ उडाली.
 
रात्री साडेदहाच्या सुमारास विमानतळाच्या स्वच्छतागृहात नवजात अर्भकाचा मृतदेह सापडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी तिथे पोहोचले आणि त्यांनी अर्भकाला रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर नवजात अर्भकाला मृत घोषित करण्यात आले.
 
या प्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून अर्भक तिथे कोणी टाकले याचा शोध घेण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0