अजित पवारांची खेळी;वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी 'या' नेत्याला संधी

    26-Mar-2025
Total Views |
 
ajit pawar
 (Image Source : Internet)
वाशिम :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांना दिली आहे. भरणे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नव्हते. आता मात्र त्यांना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडल्यानंतर वाशिमचे पालकत्व कुणाला मिळणार?असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.आता वाशिमची जबाबदारी भरणे यांच्या खांद्यावर आली आहे.
 
दरम्यान भरणे यांना पालकमंत्री करून अजितदादांनी नवी राजकीय खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.