(Image Source : Internet)
मुंबई:
अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) बच्चन हिचे लग्नापूर्वी शारीरिक संबंधांबाबतचे मत सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं योग्य की अयोग्य? यावर उत्तर देताना तिने भारताच्या पारंपरिक मूल्यांचा सन्मान राखणारी भूमिका मांडली.आपल्या संस्कृतीमध्ये अशा गोष्टींविषयी मोकळेपणाने बोललं जात नाही, कारण त्या निषिद्ध मानल्या जातात. म्हणूनच अनेक लोक या विषयावर मत देण्यासही संकोच करतात.
ऐश्वर्याने याचवेळी हेही स्पष्ट केले की, यावरची भूमिका ही प्रत्येक व्यक्तीच्या संस्कारांवर, श्रद्धांवर आणि त्याच्या वैयक्तिक जीवनदृष्टीवर अवलंबून असते. कोणताही निर्णय घेताना तो फक्त भावनांवर आधारित नसावा, तर परिपक्व विचार, परस्पर सन्मान आणि जबाबदारी याचा आधार असावा, असे ती म्हणाली.
शारीरिक जवळीक ही नात्याची एक अत्यंत खासगी आणि नाजूक गोष्ट असते. त्यामुळे त्या संदर्भात निर्णय घेताना जोडप्याने एकमेकांबद्दलचा विश्वास, मूल्यव्यवस्था आणि नात्याची परिपक्वता याचा नीट विचार करणे गरजेचे आहे.संबंध ठेवायचा निर्णय हा तुमच्या वैयक्तिक विचारांवर आणि नात्यातील समजुतीवर आधारित असावा. मात्र कोणताही निर्णय घेताना त्याचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेणं आवश्यक आहे. क्षणिक भावना हे अशा गोष्टींसाठी योग्य आधार ठरत नाहीत. सध्याच्या बदलत्या समाजात रिलेशनशिप्स सामान्य झाले असले तरी, शारीरिक संबंधांविषयी निर्णय घेताना मानसिक तयारी, जबाबदारी आणि परस्पर आदर याचा विचार करणं अनिवार्य असल्याचेही ऐश्वर्या राय म्हणाली.