(Image Source : Internet)
मुंबई:
दिशा सालियन हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे.आता पुन्हा भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी याप्रकरणी खळबळजनक दावा केला.
दिशाच्या वकिलांकडे आदित्य ठाकरेंचे ड्रग्ससाठीचे चॅट असल्याचा खुलासा नितेश राणेंनी केला. यामुळे आता आदित्य ठाकरे अडचणीत आले आहे.
दिशाचे डिसेंबरमध्ये लग्न होणार होते. तरुण मुलीला गमवलेल्या वडिलांनी आरोप केले असतील, तर हा राजकिय मुद्दा होऊ शकत नाही. मुलीचे वडिल बोलत असतील तर राजकिय मुद्दा कसा? तिचे वडिल सरकारकडे आले नाही, तर कोर्टात गेले आहेत.
दिशा सालियानच्या वकिलांकडे रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंचे ड्रग्जचे चॅट आहे.यावरून असे दिसते की,आदित्य ठाकरे स्वत: ड्रग्ज विकतो, असा आरोपही राणे यांनी केला. त्यादरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यानी काही केले नाही. 70 दिवस सीबीआयला येऊ दिले नाही, असा आरोप देखील राणे यांनी केला. हे पाहता ड्रग्ज कनेक्शनमध्ये UBT कनेक्शन म्हणजे आश्चर्य काय? असे देखील नितेश राणे म्हणाले.