(Image Source : Internet)
नागपूर :
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) पत्नी सोनाली हिचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना आज (२५ मार्च २०२५ रोजी) घडली. सोनाली सूदच्या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.मात्र अपघातात जखमी झालेल्या सोनालीवर नागपूरच्या मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने सोनालीच्या अपघाताची पुष्टी केली.अपघातादरम्यान सोनाली तिची बहीण आणि तिच्या मुलाबरोबर प्रवास करत होती. अपघातात सोनाली व तिच्या बहिणीचा मुलगा जखमी झाले आहेत. सध्या दोघांनाही नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनू सूद अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय आहे. त्यांची पत्नी सोनाली लाइमलाइटपासून दूर राहते. ती देखील त्याला सामाजिक कार्यांमध्ये मदत करते.