नागपूर हिंसाचार; इरफान अन्सारीच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक

    25-Mar-2025
Total Views |
- ४० जणांनी केला होता प्राणघातक हल्ला

Nagpur violence Two arrested(Image Source : Internet) 
नागपूर:
१७ मार्च रोजी महाल गांधी गेट परिसरात दोन गटांमध्ये दंगल उसळली. दंगलीच्या वेळी, इरफान अन्सारी (३८, वांडे नवाजनगर) नावाच्या तरुणाला जमावाने मारहाण केली. या हल्ल्यात इरफान गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तहसील पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या खून प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात असून एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव संतोष श्यामलाल गौर (२८, हंसपुरी, टिमकी) असे आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान अन्सारी हा वेल्डिंग कामगार होता. १७ मार्च रोजी तो कामासाठी इटारसीला जात होता. रेल्वे स्टेशनला जात असताना, दंगलग्रस्त हंसापुरी येथे तरुणांच्या एका गटाने इरफानला मारहाण करून गंभीर जखमी केले.
 
पोलिसांनी त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान इरफानचा मृत्यू झाला. ६ दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता इरफानने अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणी तहसील पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. इरफान खून प्रकरणात संतोष गौरला अटक करण्यात आली आहे आणि तो सध्या पोलिस कोठडीत आहे. इरफान अन्सारी यांना १७ वर्षांची मुलगी आणि पत्नी आहे. इरफान हा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता.