कुणाल कामराचे कृत्य एखाद्याविरुद्ध बोलण्यासाठी 'सुपारी' घेण्यासारखे;एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

    25-Mar-2025
Total Views |

Eknath Shinde reaction
 (Image Source : Internet)
मुंबई:
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याच्या एका गाण्यावरून वाद पेटला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एका गाण्यातून कुणाल कामराने आक्षेपार्ह टिप्पणी केली.यावरून राजकीय वातावरण पेटले.यावर आता एकनाथ शिंदेंनी पहिल्यादांच प्रतिक्रिया दिली.
 
अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही मर्यादा असायला हवी. हे एखाद्याविरुद्ध बोलण्यासाठी 'सुपारी' घेण्यासारखे आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट स्टुडिओमध्ये केलेल्या तोडफोडीच्या घटनेचे समर्थन करत नाही. समोरच्या व्यक्तीनेही एक पातळी राखली पाहिजे अन्यथा प्रत्येक कृतीची प्रतिक्रिया असते.
 
या व्यक्तीने (कामरा) सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान, पत्रकार आणि काही उद्योगपतींवरही भाष्य केले होते. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. जणू काही तुम्ही कोणासाठी तरी काम करीत आहात, असेच यातून स्पष्ट होत असल्याची टीकाही एकनाथ शिंदे यांनी केलीय. "मी यावर जास्त बोलणार नाही. मी तोडफोडीचे समर्थन करत नाही," उपमुख्यमंत्री पुढे म्हणालेत. आरोपांना उत्तर देण्यापेक्षा विकास आणि कल्याणकारी योजनांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दिला.
 
आजकाल मी आरोपांना उत्तर देत नाही. मी नेहमीच म्हणतो की, माझे काम माझे उत्तर असेल, असेही शिंदे म्हणाले.