नागपूर हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू; मेयो रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

22 Mar 2025 16:04:30
 
Nagpur violence dies at Mayo Hospital
 (Image Source : Internet)
नागपूर :
शहरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून 2 गटात दगडफेक झाली. यामध्ये काही नागरिक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये आता नागपूर हिंसाचारात जखमी झालेल्या इरफान अन्सारीचा मृत्यू झाला आहे.अन्सारी यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज 6 दिवसांनंतर इरफान अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
इरफान अंसारी हे सोमवार नागपूरच्या हंसापुरी परिसरातून गितांजली टॅाकीज चौकातून रेल्वे स्टेशनवर रेल्वे पकडण्यासाठी जात होते. त्यावेळी अचानक हिंसाचार सुरु झाला. संतप्त जमावाने इरफान अन्सारी यांना मारहाण केल्याची माहिती आहे. हिंसाचार प्रकरणात मास्टरमाईंड एमडीपी पार्टीचा शहराध्यक्ष फाईम खान याच्यासह पोलिसांनी याच पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्युबवर मोहम्मद शेहजाद खान यांना अटक केली आहे.
 
महाल आणि हंसापुरी या भागात सोमवारी रात्री घडलेला हिंसाचाराच नियोजन सकाळीच झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते.आतापर्यंत 104 लोकांना अटक करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0