(Image Source : Internet)
नागपूर:
शहरात 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शांतता टिकवून राहण्याच्या उद्देशाने अनेक भागात पोलिसांनी संचारबंदी लावली होती.
नागपूरच्या काही पोलिस ठाण्यांअंतर्गत लादलेल्या कर्फ्यूला आज काढून टाकण्यात आले आहे. शहरातील पाच पोलिस स्टेशन अंतर्गत संचारबंदी हटविण्यात आली आहे.
नागपूरमधील दंगलीला पाच दिवस उलटले आहेत, त्यानंतर आज पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील कर्फ्यू पूर्णपणे उठवण्यात आला आहे. तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत कर्फ्यू शिथिल करण्यात आला आहे.तर एका पोलिस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू कायम ठेवण्यात आला आहे. पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा आणि इमामवाडा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या परिसरातील कर्फ्यू उठवण्यात आला आहे.
२२ मार्च रोजी कोतवाली, तहसील, गणेशपेठ पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भागात संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे, त्यानंतर संचारबंदी कायम राहील. यशोधरा नगर पोलिस स्टेशन परिसरात कडक संचारबंदी पाळण्यात आली आहे.