(Image Source : Internet)
मुंबई:
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात दिलासादायक बातमी समोर येत आहे.1 एप्रिलपासून कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क (Exports tax) हटवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने बळीराजा चिंतेत होता.
आज शेतकऱ्यांना संकटातून बाहरे काढणारा निर्णय सरकारने घेतला आहे. मागील अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलने करत कांद्यावरचे निर्यातमूल्य काढण्याची मागणी करत आहेत.अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आले आहे.