तुम्ही खोट्याचा नायटा करत असाल तर... उद्धव ठाकरे संतापले

20 Mar 2025 20:47:58
 
Uddhav Thackeray
 (Image Source : Internet)
मुंबई :
दिशा सालियनचे (Disha Saliyan) मृत्यू प्रकरणावरून राजकारण तापले आहे.दिशा सालियनच्या वडिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दिशाच्या मृत्यूप्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. यावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरेंना घेरण्यास सुरुवात केली. या प्रकरणावर स्वतः उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
 
मला नवल वाटलं की मागील दोन विधानसभा अधिवेशनामध्ये हे प्रकरण आलं कसं नाही. प्रत्येकवेळी अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो. माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या चिता पेटत आहेत, त्याला जबाबदार कोण आहे. त्यांच्या चौकशीचं काय? संतोष देशमुखांची हत्या झाली, त्यांच्या हत्येचं काय? दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण न्यायालयात चालू आहे. त्यामुळे काय पुरावे आहेत ते न्यायालयात द्यावेत. जे काय आहे ते कोर्टात द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 
आमच्या घराण्याच्या सहा ते सात पिढ्या जनतेसमोर आहेत. आमचा या प्रकरणात दुरान्वयानेही संबंध नाही. पण राजकारण वाईट बाजूने न्यायचं असेल तर मात्र सर्वांचीच पंचाईत होईल. तुम्ही खोट्याचा नायटा करत असाल तर तुमच्यावरही हे पलटू शकतं, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.
Powered By Sangraha 9.0