(Image Source : Internet)
नागपूर:
नागपूरच्या महाल भागातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दुपारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे आंदोलन झाले. यावेळी औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीवर हिरवी चादर टाकून जाळली होती अशा अफवा सोशल मीडियावर पसरल्या आणि सायंकाळी दंगल भडकली. यानंतर मोठा हिंसाचार घडला.
नागपुरात हिंसाचार प्रकरणी दंगलग्रस्त भागाची पाहणी करून स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
माजी प्रांताध्यक्ष, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, आ. साजिद पठाण हे या समितीचे सदस्य असून नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील समन्वय आहेत. काँग्रेसची ही समिती दंगलग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे.