राज्य सरकारचे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने पाऊल; सरकारी शाळांबाबत घेतला ऐतिहासिक निर्णय

20 Mar 2025 16:29:04
 
CBSE Syllabus
 (Image Source : Internet)
नागपूर :
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मकता वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( CBSE) अभ्यासक्रम लागू करण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. 2025-26 शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम लागू होईल.
 
राज्य सुकाणू समितीने या अभ्यासक्रमास मान्यता दिली असून इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने CBSE अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. त्यामुळे आता मराठी भाषेत CBSE अंतर्गत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातील. 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी 1 एप्रिलपासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू होईल.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर CBSE अभ्यासक्रमास राज्याच्या गरजांनुसार आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था राष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0