नागपूर हिंसाचारादरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

    19-Mar-2025
Total Views |
 
molested during Nagpur violence
 (Image Source : Internet)
नागपूर :
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन नागपुरात सोमवारी रात्री हिंसाचार झाला. या हिंसाचारादरम्यान, समाजकंटकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
 
दुसरीकडे, या हिंसाचारादरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची माहितीही समोर आली आहे. अंधाराचा फायदा घेत काही आरोपींनी इतर महिला पोलिसांनाही शिवीगाळ करत अश्लील शेरेबाजी केली.भालदारपुरा परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील काही आरोपींनी चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर महिला पोलिसासोबत हा प्रकार केला. हिंसाचारातील आरोपींनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला स्पर्श करुन वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही महिला पोलिसांना जमावातील काही लोकांनी शिवीगाळ देखील केल्याची माहिती समोर येत आहे.याप्रकरणी आरोपीविरोधात गणेशपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
महिला पोलिसांशी केलेल्या या गैरवर्तनामुळे सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केल्या जात आहे. अशा दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी मागणी करण्यात येत आहे.