(Image Source : Internet)
जळगाव :
राज्यात महापालिका निवडणुका जवळ आल्याने भाजपने (BJP) फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली आहे. जळगावमध्ये भाजपने शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का दिला आहे.एरंडोलमधील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढणार आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे ठाकरे गटाच्या तीन माजी नगराध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते गिरीश महाजन आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
भाजपचा झेंडा हाती घेणाऱ्या भाजप नेत्यांची नावे -
दशरथ महाजन – ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख
किशोर निंबाळकर – माजी नगराध्यक्ष
राजेंद्र चौधरी – माजी नगराध्यक्ष
भगवान महाजन – अपक्ष नेते
इतर पदाधिकारी आणि माजी नगरसेवक
दरम्यान या पक्षप्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसेना (ठाकरे गट) कमकुवत होत चालली आहे, तर भाजपचा प्रभाव वाढत आहे. विधानसभेनंतर ठाकरे गटातील अनेक प्रमुख नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही याचा मोठा परिणाम होणार असल्याचे चित्र दिसत आहे.