अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बलत नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर परतल्या !

19 Mar 2025 11:33:23
 
Astronaut Sunita Williams
(Image Source : Internet) 
नवी दिल्ली:
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाची अंतराळवीर भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचा सहकारी बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांनी अखेर पृथ्वीवर परतले आहेत. फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर त्यांचे यशस्वी लँडिंग झाले. यानंतर जगभरातून आनंद साजरा करण्यात येत आहे.
 
सुनीता विल्यम्स (५९) या त्यांचे सहकारी बुच विल्मोर, निक हेग आणि अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांच्यासह स्पेसएक्स क्रू ९ ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यांचे स्पेस कॅप्सूल फ्लोरिडाच्या तल्लाहास्सी येथे मेक्सिकोच्या आखातात सुरक्षितपणे उतरले. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथील लाँच कॉम्प्लेक्स ३९ए (एलसी-३९ए) वरून फाल्कन ९ यानाने ड्रॅगन स्पेसक्राफ्ट लाँच केले होते, ज्यामधून हेग आणि गोर्बुनोव्ह हे स्पेस स्टेशनवर गेले होते अशी माहिती स्पेसएक्सने दिली आहे.
 
नऊ महिन्यांहून अधिक काळ अंतराळात राहिल्यानंतर सुनीता विल्यम्स यांना जेव्हा ड्रॅगन कॅप्सूलमधून बाहेर काढण्यात आले तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर हसू पाहायला मिळाले. कॅप्सूलमधून बाहेर आल्यानंतर विल्यम्स यांनी हसून कॅमेऱ्याकडे पाहत हात हलवल्याचे पहायला मिळाले. त्यांच्या पृथ्वीवर वापरामुळे जगभरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0