(Image Source : Internet)
मुंबई :
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणानंतर विधीमंडळात त्यावर वादंग पेटले. त्यानंतर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या संपूर्ण प्रकरणानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वक्तव्य करण्यावरून तंबी दिली असल्याच्या चर्चेवर प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत आहे. त्यांचा मी लाडका आहे. ते मला काय बोलणार?असे ते म्हणाले.
राणे यांच्या विधानाचा त्यांच्याच सरकारमधील नेत्याने समाचार घेतला. राणे यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाष्य केले. कालच माध्यमांनी दाखवलं होतं की त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली आहे. पण ते म्हणत असतील की ते मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत तर आपण ते मान्य करू. पण म्हणून लाडके असल्यावर तुम्ही काहीही बोला अशी सूट मुख्यमंत्री देणार नाहीत. त्यामुळे त्यांनी जबाबदरीने बोलले पाहिजे. तसेच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांचे दोन्ही कान टोचले असतील असे मला वाटते, असे मिटकरी यावेळी म्हणाले.