युवकांनो, भडकाऊ विधानांना बळी पडू नका; अमोल कोल्हे यांचे आवाहन

18 Mar 2025 17:20:56
 
Amol Kolhe
 (Image Source : Internet)
नागपूर :
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राज्यातील युवकांनी भडकाऊ विधानांना बळी पडू नका असे आवाहन केलं आहे. कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या भवितव्याची, करिअरची होळी होऊ देऊ नका, अशी महाराष्ट्रातील युवकांना विनंती करतो, असे कोल्हे म्हणाले.
 
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी एकमेकांची डोकी फोडण्यासाठी, घरं जाळण्यासाठी हे स्वराज्य निर्माण केलेलं नाही... जे महाराजांच्या शौर्याने मिळालंय, ते बंधुभावाने जपण्याची जबाबदारी आपली आहे मावळ्यांनो !इतरांच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी आपलं राज्य पेटवू नका गड्यांनो, असे कोल्हे म्हणाले. महाराष्ट्रात शेतमालाला भाव नाही, आमचा शेतकरी रोज आत्महत्या करतोय, तरुणांच्या हाताला रोजगार नाही, आया बहिणी सुरक्षित नाहीत अशा परिस्थितीत राज्य सरकारच्या मदतीला धावून आलाय औरंग्या… औरंग्याच्या कबरीने अचानक डोकं वर काढले… आता या कबरीचं करायचे काय? असे म्हणत डॉ. अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
 
उगाच इतिहासातील कुठल्यातरी दाखल्यांवरुन एकमेकांची डोकी फोडत हे राज्य अशांत करु नका, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0