(Image Source : Internet)
नागपूर :
औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीवरुन काल दिवसभर राज्यभरात ठीकठीकाणी आंदोलनं पेटली होती. नागपुरातही हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन संपल्यानंतर काल संध्याकाळी दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर जाळपोळ आणि दगडफेकीमध्ये झाले.
महाल परिसरात वातावरण बिघडले. या घटनेनंतर आता पोलिसांनी शांततेचं आवाहन केले आहे. तर दुसरीकडे सतर्कतेचा उपाय म्हणून काही शाळांनी आज सुट्टी जाहीर करण्यात आली. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्याकडून शहराच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरातील अनेक शाळांना अचानक सुट्टी जाहीर करण्यात आली. संदीपानी आणि शाळा सेंटर पॉइंट स्कूल आणि अन्य शाळांचाही यामध्ये समावेश आहे. मात्र शिक्षण विभागाकडून शाळांना सुट्टीच्या अधिकृत सूचना देण्यात आलेल्या नाहीत.