(Image Source : Internet)
नागपूर :
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात (Nagpur) झालेल्या हिंसाचारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. या हिंसाचारावर बोलताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे. पटोले म्हणाले, जर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या घटनेला पूर्वनियोजित म्हणत असतील, तर ते सरकार आणि पोलिसांचे अपयश आहे हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः नागपूरचे आहेत.
जर ही घटना तिथे घडत असेल, तर ते सरकारचे अपयश आहे. त्यांचे एकमेव ध्येय महाराष्ट्र उद्ध्वस्त करणे असून नागपूरमधील घटनेत सरकारचा सहभाग असल्याचा घणाघात पटोले यांनी केला.