(Image Source : Internet)
नागपूर :
शहरातील महाल परिसरात काल दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर मोठी दंगल घडली. गटांमध्ये तुफान दगडफेक आणि जाळपोळ होऊन मोठा हिंसाचार झाला. संतप्त जमावाने परिसरातील दुचाकी व चारचाकी वाहनांना आग लावली.
या नागपूर दंगलीमध्ये तीन डीसीपी जखमी झाले असून त्यातील एकावर चक्क कुऱ्हाडीने वार करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करणारे जे कुणी असतील, त्यांना सोडणार नाही,असेही देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले. यानंतर फडणवीस यांनी हिंसाचारात जखमी झालेले पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशा शुभेच्छा दिल्या. इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या धाडसाचे कौतुकही केले.