सरकारकडून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न;अनिल देशमुख यांचा आरोप

    17-Mar-2025
Total Views |
 
Anil Deshmukh alleges
 (Image Source : Internet)
अमरावती :
माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, सरकार औरंगजेबाच्या कबरीचे मुद्दे उपस्थित करून जनतेचे लक्ष खऱ्या समस्यांपासून जाणूनबुजून विचलित करत आहेत.
 
अमरावती येथे पत्रकार परिषदेत अनिल देशमुख म्हणाले की, सरकारकडून शेतकरी, महागाई आणि महिलांवरील अत्याचारांसारख्या गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. कापूस, सोयाबीन आणि संत्र्यांच्या घसरत्या किमतींसारख्या गंभीर समस्यांवर सरकार कोणतेही ठोस धोरण आखत नसल्याचा आरोप त्यांनी केला, ज्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत आहे.
 
औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत बजरंग दलाचे विधान दुर्दैवी असल्याचे देशमुख यांनी म्हटले. समाजात द्वेष पसरण्याचा आणि कायदा - सुव्यवस्था बिघडण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. माजी गृहमंत्र्यांनी सांगितले की, अनावश्यक मुद्द्यांमध्ये अडकण्याऐवजी सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करावे आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ठोस पावले उचलावीत.