(Image Source : Internet)
नागपूर :
काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत महाविकास आघाडीत येण्याचे आवाहन केले होते. यावर आता स्वतः अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अजित पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
काहीजण उगच काहीही बोलतात, आमच्याकडे या मुख्यमंत्री करू म्हणतात. पण, तुमच्याकडं माणसंच नाहीत. तुमच्याकडे 15-20 टाळकी अन् मुख्यमंत्री करू म्हणतात. पण, पुढील पाच वर्ष या सरकारला ब्रम्हदेव आला तरी धक्का लावू शकत नाही, असे म्हणत अजित पवारांनी नाव न घेता नाना पटोले यांना टोला लगावला.
दरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची महायुतीत घुसमट होत आहे. ते नाराज आहेत आणि आता त्यांचे बरं चालले परंतु पुढच्या निवडणुकीला हे दोघे उभे राहणार नाहीत, अशी व्यवस्था भाजपानं करून ठेवली. त्यामुळं या दोघांनी आमच्याकडं यावं. यांना पहिल्या खुर्चीवर बसवण्याच्या आम्ही व्यवस्था करू. मुख्यमंत्र्यांचे स्वप्न हे दोघेही बघतायेत. जर आमच्याकडे आले तर त्या दोघांनाही टर्मवाईज मुख्यमंत्री करू, अशी ऑफर नाना पटोलेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना दिली होती.