(Image Source : Internet)
नागपूर:
होळीनिमित्त नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) शहरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. यादरम्यान शहरातील ४० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. जिथे पोलिस आणि वाहतूक शाखेचे पथक मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करत आहेत. या कालावधीत ३१० हून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
होळीच्या उत्सवात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी नागपूर पोलिसांनी कंबर कसली होती. शहरात ठिकठिकणी ४ हजार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील ४० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. जिथे पोलिस आणि वाहतूक शाखेचे पथक मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर कडक नजर ठेवत आहेत.