(Image Source : Internet)
रायपूर :
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते भूपेश बघेल (Bhupesh Baghels) यांचे पुत्र चैतन्य बघेल यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (ता.10 मार्च) रोजी पहाटे धाड टाकली. भिलाई येथील त्यांच्या निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला.ईडीकडून छत्तीसगडमधील एकूण 14 ठिकाणी छापे सुरु आहे. कथित आर्थिक अनियमितता आणि मनी लाँड्रिंग प्रकरणांच्या संदर्भात ही कारवाई केली जात आहे. हे दारू घोटाळ्याशी जोडलेले असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसकडू टीका -
भूपेश बघेल मुख्यमंत्री असताना छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात दारू घोटाळ्याचे आरोप झाले होते. हा घोटाळा सुमारे 2161 कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत या प्रकरणात अनेक प्रमुख अधिकारी आणि एका माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. छत्तीसगड दारू घोटाळ्याच्या प्रकरणाची ईडी चौकशी करत आहे. मात्र काँग्रेसने याला राजकीय षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.
छाप्यानंतर भूपेश बघेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पोस्ट केली आहे. जेव्हा सात वर्षांपासून सुरू असलेला खोटा खटला न्यायालयात फेटाळण्यात आला तेव्हा ईडीच्या पाहुण्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापा टाकला. त्यांनी पुढे लिहिले की, जर कोणी या कटाद्वारे पंजाबमध्ये काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर तो गैरसमज आहे.