(Image Source : Internet)
नागपूर :
सोने (Gold) खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात शनिवारी, सोन्याच्या दरात 500 रुपयांची घट झाली, तर 22 कॅरेट सोन्याच्या (22 Carat Gold) दरात 450 रुपयांची घट झाली. देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा (24 Carat Gold) दर 86,800 रुपयांच्या आसपास आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा (22 Carat Gold) दर 79,500 रुपयांच्या आसपास आहे. एक किलो चांदीचा दर 96,900 रुपये आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. होळीपर्यंत सोने 90 हजार रुपयांपर्यंत पोहोचेल की काय, अशी भीती वाटत होती. चार दिवसांपूर्वी सोने 88 हजार रुपयांवर पोहोचले आणि नंतर थोडे खाली आले. मात्र, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी, 1 मार्च 2025 रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने सोने खरेदीची वाट पाहणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.