(Image Source : Internet)
अयोध्या :
नुकतेच प्रयागराजमध्ये भव्य-दिव्या महाकुंभ मेळ्याचा समारोप झाला. महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन राम दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.सुमारे लाखो भाविक दररोज राम दर्शन घेत आहेत. परंतु, महाकुंभमेळ्याच्या ४५ दिवसांत अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे राम मंदिराच्या व्यवस्थापनावरही मोठा ताण आला. कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी प्रशासन, राम मंदिर ट्रस्ट यांनी अनेक बदल केले.१४ जानेवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अयोध्येत येऊन तब्बल १.२६ कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले.
तसेच या महाकुंभमेळ्याच्या कालावधीत राम मंदिरही १९ तास भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. भगवान श्री राम चरणी दररोज सुमारे ३.५ ते ४ लाख भाविक हजेरी लावत होते.