सेनेलियममुळे केस गळती,आयसीएमआरच्या अहवालातून उघड; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री जाधव यांची माहिती

27 Feb 2025 14:59:53
 
Sennelium causes hair loss ICMR report
 (Image Source : Internet)
बुलढाणा:
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अखेर पत्रकार परिषदेत बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या (Hair loss) समस्येमागील कारण उघड केले आहे.आयसीएमआरने केलेल्या संशोधनात केस गळतीचे कारण सेनेलियम असल्याचे आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
 
आयसीएमआरच्या प्राथमिक अहवालात सेनेलियम हे टक्कल पडण्याचे कारण असल्याचे म्हटले आहे. सेनेलियमयुक्त गहूमुळे हा टक्कल पडण्याचा आजार झाला असल्याची माहिती प्रतापराव जाधव यांनी दिली.
 
केस गळतीच्या कारणांवरील प्राथमिक अहवालांमध्ये झिंकची कमतरता आणि सेलेनियमचे उच्च प्रमाण असल्याचे दिसून आले आहे. आता वैद्यकीय संस्था यावर सविस्तर अहवाल सादर करतील.या प्रकरणाची सध्या सखोल चौकशी सुरू झाली आहे.
Powered By Sangraha 9.0