(Image Source : Internet)
नागपूर :
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एसटी महामंडळात (ST Corporation) नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे ही भरती करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तब्बल २६३ जागा रिक्त आहेत. या नोकरीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात चेक करा. या नोकरीसाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाने या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहहे. १६ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. मेकॅनिक मोटर व्हेईकल पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
कोणत्या पदांसाठी भरती?
मेकॅनिक मोटार व्हेईकल – 55 पदे,मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर – 60 पदे, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल – 30 पदे, वेल्डर – 20 पदे, पेंटर – 06 पदे, डीझेल मेकॅनिक – 70 पदे, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडीशनर टेक्निशियन – 10 पदे , इलेक्ट्रॉनिक्स तज्ञ – 10 पदे , अभियांत्रिकी पदवीधर (Graduate Engineer) – 02 पदे उपलब्ध आहेत.
पात्रता आणि वयोमर्यादा -
16 ते 33 वर्षे उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी. वेल्डर, पेंटर, इलेक्ट्रॉनिक्स, शीट मेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग यासारख्या तांत्रिक पदांसाठी उमेदवारांनी संबंधित ITI कोर्स पूर्ण केलेला असावा.