(Image Source : Internet)
मुंबई :
बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Actor Govinda) यांचा ३७ वर्षांचा संसार मोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा वेगवेगळे राहतात. याचा खुलासा सुनिता अहुजाने एका मुलाखतीत केला होता. आता गोविंदा आणि सुनिता घटस्फोट घेत वेगळे होणार असल्याच्या चर्चा आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदा आणि सुनिता अहुजा ३७ वर्षांच्या सुखी संसार मोडणार असल्याचे बोलले जात आहे.
गोविंदा आणि सुनिताने १९८७ साली लग्न करत संसार थाटला होता. त्यांना टीना आणि यशवर्दन ही दोन मुले आहेत. गोविंदा आणि सुनिता हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
गोविंदाचे एक्स्ट्रा मरेटिअल अफेअर असल्याची चर्चा -
गोविंदाचे एक्स्ट्रा मरेटिअल अफेअर असल्याच्या चर्चा सुरु आहे. ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाचे नाव जोडण्यात येत आहे. त्यामुळे गोविंदा आणि सुनिताचा ३७ वर्षांचा संसार मोडणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप याबाबत अभिनेत्याकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.