(Image Source : Internet)
नवी दिल्ली:
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेत. दोन्ही मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सरपंच हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे संकटात सापडलेत. तर अजित पवार गटाचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे हेदेखील एका जुन्या वादामुळे अडचणीत आले. या सर्व घडामोडी पाहता पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
दिल्लीतील शपथविधी सोहळ्याता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते.
त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली याचा तपशील समोर आला. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वच्छ प्रशासन करा असे आदेश दिलेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राजीनामे घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तळात होत आहे. राज्यातील प्रशासन स्वच्छ असावे, त्यात कुणाचीही पर्वा करू नका, असे आदेश देणार पत्र पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.