(Image Source : Internet)
मुंबई :
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांना धारेवर धरले आहे. मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधत राऊत यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे इतके आरोप होत आहेत. काल एका भ्रष्टाचाऱ्याच्या प्रकरणामध्ये एका मंत्र्याला दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. तर धनंजय मुंडे यांच्यावर कृषी खात्यात घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. स्वतः भाजपच्या नेत्यांनी त्यांना राजीनामा मागितला आहे. हे पाहता अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत, असे राऊत म्हणाले.
नैतिकतेची जर गोष्ट असेल तर वेळ वाया न घालवता दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. एकमेकांवर का ढकलत आहेत? इतका मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे. माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात तर कोर्टानेच त्यांना शिक्षा ठोठावली आहे. विधानसभा अध्यक्षांवर काय तुम्ही सोडत आहात? विधानसभा अध्यक्ष काय निष्पक्ष आहेत का? आमच्या वेळेस 40 आमदारांच्या प्रकरणात आम्ही त्यांचे चालचलन पाहिलेले आहे, असे संजय राऊत म्हणाले.