कुंभमेळ्यात एक हजारांवर लोक चेंगराचेंगरीत मेले,सरकारकडून फक्त 38 लोकांचाच आकडा जाहीर;आंबेडकरांचा आरोप

20 Feb 2025 16:34:03
 
Prakash Ambedkar
 (Image Source : Internet)
मुंबई:
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर भाष्य केले.तसेच मृतांच्या आकड्यावरून संशय व्यक्त करत सरकारवर हल्लाबोल केला.
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कुंभमेळा हा लोकांचा भावनिक, वैयक्तिक प्रश्न आहे. या कुंभमेळाव्याची उत्तर प्रदेश सरकारने सोय केली, पण ज्या पद्धतीने कुंभमेळ्याचे मार्केटिग चाललं आहे त्याचा निषेध आहे. कुंभमेळाव्यात 1 हजारांवर चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडले हे दुर्दैवी आहे. शासनाने फक्त 38 लोक मयत झाले म्हणून जाहीर केले,असा दावा आंबेडकर यांनी केला. हिंदू संघटनांना आवाहन आहे, या लोकांचे अंत्यविधी कसे केले हे जाहीर करावं, असे त्यांनी सांगितले. या सगळ्या घटना पाहता धर्माचे राजकारण हे देशाला आता धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचलं असल्याचे ते म्हणाले. आज विरोधी पक्ष लकवा मारलेल्या परिस्थितीत गेला आहे. त्यातून त्यांनी स्वतःला सावरत दुरुस्त करावे आणि हिटलरशाहीच्या सरकारचा विरोध करावा असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Powered By Sangraha 9.0