(Image Source : Internet)
मुंबई :
विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला तर शिंदे यांच्या महायुती सरकारला बहुमत मिळाले.
या निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला एकामागे धक्के देणे अजूनही सुरूच आहे. आता हेच धक्के थांबवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आउटगोइंग रोखण्यासाठी व शिंदे सेनेचे ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी खास प्लॅन तयार करण्यात आला आहे.
उध्दव ठाकरेंकडून गेल्या काही दिवसापासून हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी रणनीती आखली जात होती. त्यानुसार प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्याची जबाबदारी आता सर्व ठाकरे सेनेच्या अनुभवी नेत्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आढावा बैठक होईल. पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी ही ठाकरे सेनेची रणनिती आहे. पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहेत. ही रणनीती आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशस्वी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.