-प्रशासनाकडून विशेष व्यवस्था
(Image Source : Internet)
प्रयागराज:
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभ (Mahakumbh) मेळ्यात आत्तापर्यंत कोट्यवधी भाविकांनी त्रिवेणी संगमाला भेट देऊन पवित्र स्नान केलं आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशमधील ७५ तुरुंगात शिक्षा भोगत असलेले ९० हजार कैदीही प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातील पवित्र पाण्याने स्नान करणार आहेत. त्यासाठी त्रिवेणी संगमामधील पवित्र पाणी आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील जेलमंत्री दारा सिंह चौहान यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून १० वाजेपर्यंत सर्व तुरुंगांमध्ये आयोजित होणार आहे.