(Image Source : Internet)
नागपूर :
जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही एक्स पोस्टवरुन शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा मोठी चूक केली आहे.
राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, अशी पोस्ट केल्याने वादंग उठले. यावर सत्ताधारी नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका कारण्यास सुरुवात केली. या टीकेला आता काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उत्तर देताना राहुल गांधी यांचा बचाव केला आहे.
विरोधकांनी विनाकारण ध चा मा करु नये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन न करता विरोधकांनी राहुल गांधींच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे.
हा खेळ काही विरोधकांचा नवा नाही, पंडित जवारलाल नेहरू यांच्या संदर्भात अशाच प्रकारचे काम करण्यात आले होते. राहुल गांधींच्या ट्विटचे गुगल ट्रॉन्सलेट केल्यास श्रद्धांजली शब्द येतो आहे. ही एक तांत्रिक चूक पण विरोधक विनाकारण राजकरण करत आहेत. मी त्यांना अभिवादन करतो, मी त्यांचा आदर करतो, हा त्यांच्या मागचा भाव आहे. त्यामुळे विरोधकांनी ध चा मा करु नये, असा पलटवार सपकाळ यांनी केला.