उद्धव ठाकरेंना झटका; राजन साळवी नंतर ' 'हा' बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर

    18-Feb-2025
Total Views |
 
Uddhav Thackeray
 (Image Source : Internet)
नागपूर:
नुकतेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena UBT) पक्षाला कोकणात मोठा धक्का बसला. माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.
 
ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सध्या कोकणात ठाकरे गटाकडे केवळ आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार वैभव नाईक हेच उरले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे कोकणातील परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
 
राजन साळवी यांच्यावर एसीबी (ACB) चौकशीचा दबाव असल्याने त्यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला. आता वैभव नाईक यांच्यावरही एसीबी चौकशीचा ससेमिरा असल्याने त्यांचा पुढचा निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच साळवी नंतर नाईकही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
 
शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी या संदर्भात मोठा दावा करत सांगितले की, ठाकरे गटातील अनेक लोक आमच्या पक्षात येणार आहेत. येत्या आठवड्यात कोकणात मोठे राजकीय फेरबदल पाहायला मिळतील.