(Image Source : Internet)
मुंबई :
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणाऱ्या निर्णयाबाबत पत्रकारांना माहिती देणाऱ्या सहकारी मंत्र्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नाराजी व्यक्त केली.मंत्रिमंडळ बैठकीआधीच घेण्यात येणाऱ्या निर्णयांची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीआधीच असे निर्णय बाहेर येणं चुकीचे आहे. मी मंत्र्यांनाही याबाबतची सूचना दिली आहे. मंत्र्यांच्या कार्यालयांनी याबाबत खबरदारी घ्यावी, अन्यथा मी कारवाई करेन, असे सांगितले आहे. कारण आपण गोपनीयतेची शपथ घेतलेली असते, असेही फडणवीस म्हणाले.दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सहाव्या राज्य वित्त आयोगासह अन्य महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.