(Image Source : Internet)
मुंबई :
सध्या शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'ची महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. यावरुनच आता शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुतीवर जोरदार टीका केली.
"कसलं ऑपरेशन टायगर? आज त्यांच्याकडे सत्ता आहे. त्यामुळे त्यांना सत्तेची मस्ती चढलीय. आम्हीही सत्ता भोगलेली आहे. परंतु, सत्तेचा माज आणि अशी विकृती केलेली नाही. सत्ता आणि यंत्रणा असल्यामुळं ते दुसऱ्यांवर दबाव टाकत आहेत. परंतु, फक्त दोन तास ईडी आमच्या ताब्यात द्या. मग अमित शाहसुद्धा आमच्या पक्षात येतील की नाही ते बघा. दोन तास ही सर्व यंत्रणा आमच्या हातात असेल तर हे सर्व नेते बावनकुळेंपासून ते सगळे मातोश्रीवर येऊन आमच्या पक्षात प्रवेश करतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
शिवसेना नेते रामदास कदम जर मी तोंड उघडलं तर उद्धव ठाकरेंना देश सोडून पळून जावं लागेल,असे वक्तव्य केले. यावरही राऊत यांनी भाष्य केले. अरे बापरे! जर कदम असे बोललेत, तर आम्हाला बोलायला तोंड नाही का? सर्वांना तोंड आहे. परंतु, पक्षानं नाव आणि सर्व पद देऊन त्यांच्याविषयी असं बोलत असाल तर ते हे राजकारणातील नैतिकतेला धरून नाही. तुम्ही पराभूत झाल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर तुम्हाला पाठवलं होतं. याची जर जाण नसेल, कृतज्ञता नसेल तर त्यांच्याकडे माणुसकीही नाही, असा घणाघात राऊत यांनी केला.