(Image Source : Internet)
मुंबई :
विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने ठाकरे गटाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाला खिंडार पाडण्यासाठी शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरू केले आहे. याकरिता शिंदे गटाने ठाकरे गटाच्या नेत्यांना पक्ष सोडावा यासाठी पैशांची ऑफर देण्यास सुरुवात केल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना फोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू आहे. पक्ष फोडण्यासाठी पैशांचं आमिष दाखवलं जात आहे.
राज्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली. पक्ष संघटना मोठी केले असल्याचेही ते म्हणाले. डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात - शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरमुळे पक्षाची पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी साथ सोडत असल्यामुळे ठाकरे गटाचे डॅमेज कंट्रोल सुरू झाले आहे. ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची 20 फेब्रवारीला बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार सहभागी होतील. तर खासदारांची 25 फेब्रवारीला बैठक बोलवली आहे. मुंबईत मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.