(Image Source : Internet)
मुंबई:
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. अलीकडेच कोकणातील ठाकरे गटाचा मोठा चेहरा असणाऱ्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे भागातील एका नेत्याने पत्र लिहिले असून, पक्षाला रामराम ठोकला आहे.
मुंबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. विभाग प्रमुख अनिल परब यांनी आपल्याला कार्यक्षेत्राच्या बाहेर ठेवल्याचा आरोप करत जानावळे यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनामा पत्र लिहिले आहे. ''साहेब माफ करा” संघटनात्मक चुकीच्या पद्धतीला मी कंटाळलो आहे मी राजीनामा देत असल्याचे जानावळे पत्रात म्हणाले.