देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण होणार? पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक, राहुल गांधींचीही उपस्थिती!

    17-Feb-2025
Total Views |
 
PM Modi and Rahul Gandh
(Image Source : Internet) 
नवी दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय निवड समितीची आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहतील. मात्र ही बैठक कोणत्या करणासंदर्भात होणार याबाबत माहिती समोर आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीची ही बैठक आहे.
 
देशाच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार १८ फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीची आयोजन करण्यात आले आहे.
 
मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या शर्यतीत ज्ञानेश कुमार यांचे नाव आघाडीवर आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती ही नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणार का? विद्यमान निवडणूक आयुक्तांपैकी एकाची या पदावर नियुक्ती करण्यात येणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
 
दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी २०२२ मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगानं २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या आहेत. यामध्ये जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांच्या निवडणुकांचा समावेश आहे. तसेच यावर्षी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा केला जात असल्याचे विरोधी पक्षांनी वारंवार आरोप केले आहेत. हे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत.