राज्यात उन्हाची झळ लागायला सुरुवात ; तापमानात होतेय वाढ,IMD ने दिला इशारा

    15-Feb-2025
Total Views |
 
summer
 (Image Source : Internet)
नागपूर :
गेल्या काही दिवसांपासून राज्यातून थंडी गायब होताना दिसत आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी पहाटे थंडी जाणवत असली तरी सकाळी ८ नंतर तापमानात वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी १४ तारखेला महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद नंदुरबार आणि सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाली आहे. दोन्ही ठिकाणीचे तापमान ४० अंशावर पोहोचल्याचे पहायला मिळाले. तर पुण्यात बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा ३५ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. त्यामुळे नागरिकांना उकाडा जाणवला.
 
डॉ. के. एस. होसाळीकर (माजी प्रमुख, IMD पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी रोजी राज्यात किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
 
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.