(Image Source : Internet)
नागपूर:
भारतीय रेल्वेने (Indian Railway) ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.आज म्हणजे 15 फेब्रुवारी 2025 पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष भाडे सवलत योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत महिला ज्येष्ठ नागरिकांना (58 वर्षे व त्याहून अधिक) 50% सवलत, तर पुरुष ज्येष्ठ नागरिकांना (60 वर्षे आणि त्याहून अधिक) 40% सवलत दिली जाणार आहे.
या योजनेचा उद्देश, निश्चित उत्पन्नावर जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास खर्च सुलभ करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे ते आपल्या कुटुंबाला भेट देऊ शकतील, धार्मिक यात्रा करू शकतील किंवा आवश्यक कारणांसाठी देशभर प्रवास करू शकतील.महिला प्रवाशांना किमान 58 वर्षे वय असावे. पुरुष प्रवाशांना किमान 60 वर्षे वय असावे. ही सवलत फक्त भारतीय (Indian Railways) नागरिकांसाठी लागू आहे. Tatkal तिकीटांवर ही सवलत लागू होणार नाही.