वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या घटणार; प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे रेल्वेने घेतला मोठा निर्णय

14 Feb 2025 18:17:28
 
Vande Bharat Express
 (Image Source : Internet)
नागपूर :
वंदे भारत एक्सप्रेसच्या (Vande Bharat Express) डब्यांची संख्या कमी होणार आहे. प्रवाशांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानंतर रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे.वंदे भारत एक्सप्रेसने गेल्या वर्षी सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील नागपूर आणि तेलंगणातील सिकंदराबाद दरम्यान धावण्यास सुरुवात केली. मात्र सहा महिन्यांच्या आत ट्रेनचे डब्बे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २०१०१ आणि २०१०२ क्रमांकाच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या कोच रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर आणि बल्लारशाह स्थानकांवरून जाणारी नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या संख्येअभावी ७० टक्क्यांहून अधिक रिकामी धावत होती. यामुळे मध्य रेल्वेने या ट्रेनच्या डब्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला.
 
सप्टेंबरमध्ये नागपूरहून सिकंदराबादला निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एकूण २० डबे होते, आता ते ८ पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जो १९ फेब्रुवारीपासून कायमस्वरूपी लागू केला जाईल.
Powered By Sangraha 9.0